Festival Inflationसणासुदीच्या दिवसांत महागाईची झळही ग्राहकांना,दिवाळीपर्यंत पोहे, चिवडाही महागणार
Continues below advertisement
बाजारात गणेशोत्सवाची लगबग आहे, आणि सणासुदीच्या दिवसांत महागाईची झळही ग्राहकांना सोसावी लागतेय. एकीकडे दूध महागलं असताना आता दिवाळीपर्यंत पोहे, चिवडा हा फराळही महागणार आहे. गेल्या तीन महिन्यांपासून पोहे, भाजके पोहे, दगडी पोहे, पातळ पोहे, भडंग, मुरमुऱ्याच्या दरात वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात गेल्या तीन महिन्यांत पोहे, भडंग, मुरमुऱ्याच्या दरात किलोमागे सरासरी पाच ते सहा रुपयांनी वाढ झाली आहे. कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे ही दरवाढ झाली असून ही तेजी दिवाळीपर्यंत कायम राहील असं व्यापाऱ्यांनी सांगितलं.
Continues below advertisement