NHAI FASTag Pass : 200 टोलनाके फक्त 3 हजारात, वर्षभरासाठी मिळणार पास ABP MAJHA
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या एका महत्त्वाच्या निर्णयासंदर्भात बीपी माझा बातमी देत आहे. पंधरा ऑगस्टपासून एक नवी सेवा कार्यान्वित होत आहे. या सेवेअंतर्गत, तीन हजार रुपयात दोनशे टोलनाक्यांचा पास मिळणार आहे. ही फास्टटॅग वार्षिक पास योजना खास खाजगी वाहनांसाठी असणार आहे. एका वर्षासाठी टोल पास तीन हजार टोल जो आहे तो दोनशे टोल पास किंवा फास्टटॅग वार्षिक पास योजना खास खाजगी वाहनांसाठी असणार आहे. यासाठी पूर्वनोंदणी सुरु झाली आहे. इच्छुक वाहनधारकांना लवकरात लवकर नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ही सेवा पंधरा ऑगस्टपासून देशभरात लागू होत आहे. याचा थेट लाभ नियमित प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना होणार आहे. ही योजना टोल प्लाझावरील गर्दी कमी करण्यास आणि प्रवासाचा अनुभव सुधारण्यास मदत करेल.