Farmers Reaction on Maharashtra Budget 2023 : तुटपूंजी मदत करण्यापेक्षा शेतमालाला हमीभाव द्या

Continues below advertisement

Farmers Reaction on Maharashtra Budget 2023 : तुटपूंजी मदत करण्यापेक्षा शेतमालाला हमीभाव द्या

Kisan Sabha On Maharashtra Budget 2023 : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात (Maharashtra Budget) शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. मात्र, शेतकरी संघटनांनी अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली आहे. शेतकरी जे मागत आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे आणि शेतकऱ्यांनी जे कधीच मागितलं नव्हते ते शेतकऱ्यांना देऊन आम्ही शेतकऱ्यांसाठी किती चांगले करतोय असे दाखवण्याचा प्रयत्न करायचा असा हा प्रकार असल्याची प्रतिक्रिया अखिल भारतीय किसान सभेने (All India Kisan Sabha) अर्थसंकल्पावर व्यक्त केली आहे.  शेतकऱ्यांच्या मूळ समस्यांना बगल देत सवंग लोकप्रियता आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घोषणा केली असल्याचे किसान सभेने म्हटले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram