Buldhana : महामार्गाच्या कामाचा शेतकऱ्यांना फटका, वाहनं आडवणाऱ्या शेतकऱ्यांना अटक

Continues below advertisement
बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र 6 च काम सुरू असल्याने खामगाव - नांदुरा दरम्यान असलेल्या कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी ने लावलेल्या स्टोन क्रशर व डांबर प्लांट मुळे प्लांट वरून ये जा करणाऱ्या अवजड वाहनांमुळे प्लांट नजीकच्या शेतकऱयांनी त्यांच्या शेतीच व पिकांचं नुकसान होत असल्याने या वाहनांचा रस्ता एक दिवसभर अडवला होता. त्यामुळे कंपनीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून जलंब पोलिसांनी 08 शेतकऱ्यांवर 341,143,147,179 नुसार गुन्हा दाखल केलाय .तक्रारीत म्हटलं आहे की कामावरील वाहने अडवून ठेवल्याने कंपनीच 08 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. कंपनीच नुकसान होतंय पण या वाहनांमुळे शेतकाऱयांच नुकसान होतंय त्याच काय..? शेतकऱयांना नुकसान भरपाई कोण देणार...? हे प्रश्न उपस्थित रहात आहेत पण या बद्दल कंपनी कडून कुणीही बोलत नाहीये....हा शेतकऱ्यांवर अन्याय असून जर शेतकाऱ्यांवरील गुन्हे मागे घेतले नाही तर स्वाभिमानी स्टाईलने धडा शिकवू अस स्वाभिमानी चे नेते रविकांत तुपकर यांच म्हणणं आहे....
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram