Sanjay Raut on Floods : शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची मदत द्या, संजय राऊतांचा मागणी
Continues below advertisement
कॅबिनेटच्या बैठकांवर बैठका होत असतानाही नैसर्गिक संकटाचा सामना योग्य प्रकारे होत नाहीये. मुख्यमंत्री दिल्लीला गेले होते आणि प्रधानमंत्र्यांनी अहवाल पाठवण्यास सांगितले होते, परंतु तो अहवाल गेला की नाही हे स्पष्ट नाही. आता पुन्हा कॅबिनेटमध्ये चर्चा होणार आहे. सध्याचे मदतीचे निकष बदलले जात नाहीत, ज्यामुळे पूरपरिस्थिती आणि दुष्काळाचा सामना करणे कठीण होत आहे. मुख्यमंत्री एक-दोन दिवस पूरग्रस्त भागात होते आणि त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना नियम व कायद्यावर बोट न ठेवता काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या, परंतु तसे होताना दिसत नाहीये. "आजच्या कॅबिनेट मध्ये सगळ्यात आधी मदतीचे निकष बदलणं गरजेचं आहे." असे म्हटले आहे. शेतकऱ्यांचे उभे पीक शेतजमिनीसह नष्ट होते आणि पुढील तीन-चार वर्षे ते कोणतेही पीक घेऊ शकत नाहीत, अशी स्थिती निर्माण होते तेव्हा तो दुष्काळ असतो.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement