Maharashtra Farm Loan Waiver | सामनाचा सरकारला इशारा: 'खजिन्याची खिडकी उघडा, कर्जमाफी द्या!'

Continues below advertisement
सामना अग्रलेखातून राज्य सरकारवर टीका करण्यात आली आहे. 'महाराष्ट्रावरचं आभाळ फाटलंय, त्यामुळे सरकारला मदतीसाठी खजिन्याची खिडकी उघडावी लागेल' असे अग्रलेखात म्हटले आहे. विरोधीपक्ष काय करतोय हा सत्ताधाऱ्यांचा प्रश्न मूर्खपणाचा आहे असे प्रत्युत्तर सामनातून देण्यात आले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली होती याची आठवण करून देण्यात आली. आताच्या गंभीर परिस्थितीतही सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी आणि तशी घोषणा लगेच करावी अशी मागणी अग्रलेखातून करण्यात आली आहे. 'राजकारण आम्ही करत नाही, तुम्हीही करू नका' असेही सामनातून सुनावण्यात आले. फडणवीसांनी देखील कर्जमाफीची लगेच घोषणा करावी अशी मागणी या अग्रलेखातून करण्यात आली आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या प्रश्नालाही सामनातून उत्तर देण्यात आले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola