Farmer Loan | बीडमध्ये SBI ने शेतकऱ्याचं खातं केलं Freeze, कृषी कार्यालयाकडूनही नाही मदत
बीड जिल्ह्यातील परळी येथे राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. एका शेतकऱ्याने SBI मधून पीक कर्ज घेतले होते. हे पीक कर्ज थकीत झाल्यामुळे बँकेने थेट शेतकऱ्याच्या खात्यावरील सर्व व्यवहार थांबवले. शेतकरी बँकेत पैसे काढण्यासाठी गेला असता, त्याला ही बाब लक्षात आली. याबाबत शेतकऱ्याने बँक अधिकाऱ्याकडे विचारणा केली असता, त्यांनी कर्ज थकीत राहिल्यामुळे खात्याचे व्यवहार थांबवल्याचे सांगितले. यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांचे पत्र आणल्यास व्यवहार पूर्ववत केले जातील, असे बँकेने शेतकऱ्याला सांगितले. यावर शेतकऱ्याने कृषी कार्यालय गाठले. मात्र, कृषी कार्यालयाने पत्र देण्याचा अधिकार नसल्याचे शेतकऱ्याला सांगितले. "ते म्हणाले आम्हाला कृषी अधिकारी अधिकाऱ्याकडून लेटर आणा लेटर आणा तर आम्ही तुमचे पैसे काढून देऊ," असे शेतकऱ्याने सांगितले. बँकेचे क्रॉप इन्शुरन्स काढलेले कर्ज होते, त्यावर खातं होल्ड मारलेलं आहे. यामुळे शेतकरी बँक आणि कृषी कार्यालय यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे अडचणीत सापडला आहे.