Farmer Protest : आंदोलक शेतकऱ्यांचा Rail Roko चा इशारा, रेल्वेचं नुकसान टाळण्यासाठी RPF ला अलर्ट

Continues below advertisement

केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलनात संयुक्त किसान मोर्चानं आज देशभरात रेल रोको आंदोलन पुकारलंय. त्यानुसार सकाळी 10 ते संध्याकाळी 4 पर्यंत रेल्वे आणि रुळांवर धरणे आंदोलन करत रेल रोको केला जाईल. केंद्रीय कृषी कायदे मागे घ्या, MSPवर शेतमाल खरेदीची हमीचा कायदा बनवा आणि लखीमपूर खीरी हत्याकांडात गृहराज्यमंत्र्याना पदावरुन हटवण्याची आंदोलकांची मागणी आहे. त्यावरुन शेतकरी आंदोलन करताहेत. आंदोलकांच्या इशाऱ्यानंतर रेल्वे प्रशासन आणि यंत्रणा सज्ज झालीय. रेल्वेचं नुकसान टाळण्यासाठी आरपीएफलाही अलर्ट देण्यात आलाय. जिथे-जिथे रेल रोकोची शक्यता आहे, तिथे तिथे जास्तीचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram