सोयापेंड आयातीचा कुठलाही विचार केंद्राकडे विचाराधीन नाही, पाशा पटेल यांनी घेतली पियुष गोयल यांची भेट
सोयापेंड आयातीचा कुठलाही विचार केंद्राकडे विचाराधीन नसल्याचं पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे. ट्विट करुन त्यांनी ही माहिती दिली आहे. महाराष्ट्र कृषीमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी पीयूष गोयल यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. सोयापेंडच्या आयातीमुळे देशातील सोयाबीनचे दर पडणार असल्याची चिंता शेतकऱ्यांकडून व्यक्त झाली होती. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्वपूर्ण मानला जात आहे.