Farmers' Protest : 'सरकारनं आमचं आंदोलन बदनाम करण्यासाठी पैसे वाया घालवू नयेत', Bachchu Kadu यांचा इशारा
Continues below advertisement
शेतकरी नेते बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी नागपूर येथील शेतकरी आंदोलनाच्या (Nagpur Farmer Protest) पार्श्वभूमीवर सरकारला सज्जड दम दिला आहे. 'सरकारनं आमचं आंदोलन बदनाम करण्यासाठी पैसे वाया घालवू नयेत, आम्ही लढतच राहणार', असा थेट इशारा बच्चू कडू यांनी एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमातून दिला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस बच्चू कडू यांच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांनी संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी नागपुरात राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला होता. या आंदोलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची उच्च न्यायालयाने दखल घेतली होती. सरकारने कर्जमाफीसाठी समिती स्थापन करून ३० जून २०२६ पर्यंत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले असले तरी, दिलेल्या मुदतीत कर्जमाफी न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कडू यांनी दिला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement