Faridabad Terror Module: डॉक्टर आणि उच्चशिक्षितच दहशतवादी? फरीदाबादमध्ये बॉम्ब फॅक्टरीचा पर्दाफाश.
Continues below advertisement
जम्मू काश्मीर (Jammu and Kashmir) पोलिसांच्या तपासात एका मोठ्या आंतरराज्यीय दहशतवादी कटाचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणी डॉक्टर आणि इतर उच्चशिक्षित व्यावसायिकांसह सात जणांना अटक करण्यात आली आहे. हरियाणातील फरीदाबाद (Faridabad) येथे एका डॉक्टरच्या घरातून बॉम्ब बनवण्याची फॅक्टरी उघडकीस आली असून, तेथून सुमारे २९०० किलो अमोनियम नायट्रेट आणि इतर स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. जम्मू काश्मीरमध्ये लावलेल्या काही पोस्टर्सवरून सुरू झालेला तपास या मोठ्या 'व्हाईट कॉलर टेरर इकोसिस्टम'पर्यंत पोहोचला. जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, 'या गटाने कट्टरता, समन्वय, निधी आणि लॉजिस्टिक्ससाठी एनक्रिप्टेड चॅनेलचा वापर केला आहे.'
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement