Maharashtra : राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका; कापूस आणि सोयाबीनच्या पीकाचं नुकसान
यंदाच्या मोसमात पावसानं रौद्र रुप दाखवलं आणि अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला आणि आता जाता जाता देखील पावसानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात आसू उभे केलेत. परतीच्या पावसानं बुलढाणा, वाशिम, परभणी, हिंगोलीसह राज्यातल्या अनेत ठिकाणी उभ्या पीकाचं नुकसान केलंय. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळं, आज आणि उद्या विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलाय. हिंगोलीत कयाधू नदीला पूर आला आहे. बुलढाण्यातही पावसाचा जोर चांगलाच वाढलेला दिसत असून अनेक ठिकाणी कापूस आणि सोयाबीनच्या पीकाचं मोठं नुकसान झाल आहे.
Tags :
Maharashtra Heavy Rainfall Vidarbha Marathwada Buldhana Cotton Farmers Hingoli Soybean Soyabean Vidharba