Fake School Action : बोगस शाळांवरील कारवाईसाठी 25 एप्रिलची मुदत, सूरज मांढरेंचे आदेश

Continues below advertisement

राज्यातील अनधिकृत शाळांवर शासनाच्या प्रचलित धोरणानुसार कारवाई करा, असे आदेश शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकांना दिले आहेत. दंड आकारणे, एफ आय आर दाखल करणे,शाळा बंद करणे इत्यादी कारवाई 25 एप्रिल पूर्वी केली जाणार आहे. विभागातील शाळांचे वैधता प्रमाणपत्राची तपासणी पूर्ण करून अंतिम अहवाल 18 एप्रिल सकाळी 11 ते 5 या वेळेस सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे यानंतर कार्यवाही करण्यासाठी मुदतवाढ दिली जाणार नाहीये. बोगस शाळांवरील कारवाईमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता सुद्धा घेतली जाणार आहे..  बोगस शाळांमधील विद्यार्थ्यांचे समायोजन जवळच्या शाळेत करण्याचे सूचना देण्यात आल्या आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram