Fake Drugs Scam :बनावट औषधांची विषारी चेन;वर्ध्यासह काही जिल्ह्यात विशाल एंटरप्राईजेसकडून औषध पुरवठा

Continues below advertisement

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या रुग्णालयात बनावट औषधांच्या खास करून बनावट टॅबलेटच्या पुरवठ्यामागे एक मोठी चेन असल्याची माहिती समोर आली आहे... असा प्रकार सर्वप्रथम काही महिन्यांपूर्वी नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर मध्ये उघडकीस आले होते... तेव्हा नागपूर ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केले होते... पुढे तपासात अशाच गोळ्या वर्धा नागपूर शहर धाराशिव नांदेड आंबेजोगाई बीड आणि भिवंडी मध्येही पुरवल्याचे टप्प्याटप्प्याने समोर येत गेले...वर्ध्यासह काही जिल्ह्यात विशाल एंटरप्राइजेस नावाच्या कंपनीने या बनावट गोळ्या पुरवल्याचे तपासात समोर आले होते. तर नागपूरसह राज्यातील इतर काही शासकीय रुग्णालयात एम. जया एंटरप्राइजेस नावाच्या कंपनीकडून अशाच पद्धतीने बनावट गोळ्या पुरवल्याचे तपासात उघड झाले. एबीपी माझाला मिळालेल्या माहितीनुसार विशाल एंटरप्राइजेस नावाच्या कंपनी मागे कोल्हापूरचा पाटील नावाचा व्यक्ती आहे.. एम जया एंटरप्राइजेस च्या पुरवठामागे हेमंत मुळे असे नाव समोर आले होते.

जया आणि विशाल एंटरप्राईजेस या दोन कंपन्यांकडून राज्यात शासकीय रुग्णालयांना बनावट औषध पुरवठा

या दोन्ही कंपन्या मिहिर त्रिवेदीच्या एक्वाटिंस बायोटेककडून जेनरिक औषधे मिळवायचे 

एक्वाटिस बायोटेकला काबीज जेनरिककडून औषधांचा पुरवठा

काबीज जेनरीक कंपनीला उत्तराखंडमधील रॉबीन आणि रमण तनेजांकडून औषध पुरवठा

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram