Devendra Fadnavis vs Ambadas Danve : फडणवीसांची 'ऑफर' मस्करी, दानवेंचा 'कुंडली'चा पलटवार!
मुख्यमंत्री फडणवीसांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ठाकरेंवर टीका केली. ठाकरेंचा पक्ष पहिल्यांदा शरद पवारांनी फोडला, मात्र त्याच पवारांसोबत एकत्र येऊन ठाकरे मुख्यमंत्री झाले असे फडणवीस म्हणाले. उद्धव ठाकरेंचा त्यांच्या आमदारांशी संपर्क तुटला होता, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरून फडणवीसांनी भाष्य केले. राजकीय मजबूरी म्हणून दोघे एकत्र आले अशी टीका फडणवीसांनी केली. "कोणत्याही लग्नात गेलं की तेच नवरदेव, असं ठाकरेंना वाटतं," असे फडणवीस म्हणाले. ठाकरे बंधू एकत्र आले तरी मुंबई पालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचाच विजय होणार, असेही फडणवीसांनी म्हटले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोपाच्या भाषणावेळी उद्धव ठाकरेंना फडणवीसांनी सोबत येण्याची ऑफर दिली होती, मात्र ही ऑफर मस्करी होती असे फडणवीसांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंचीदेखील एकत्र येण्याची शक्यता फारच कमी आहे असेही फडणवीस म्हणाले. यावर अंबादास दानवे यांनी पलटवार केला. आमदाराशी संपर्क तुटला वगैरेपेक्षा तुमची ईडी, सीबीआय आणि पोलीस बाजूला केल्यास आमदार परत येतील असे दानवे म्हणाले. "प्रत्येकाची कुंडली आपल्याकडे आहे की कोण कशामुळे गेलेला आहे," असेही दानवे यांनी नमूद केले.