Fadnavis Shinde Rift | D वर्ग महापालिका अधिकारी नियुक्तीवरून नाराजीची चर्चा

Continues below advertisement
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात नाराजीची चर्चा आहे. ड वर्ग महापालिकांवर अधिकारी नेमण्यावरून हा वाद निर्माण झाला आहे. साडेचार लाख लोकसंख्या आणि सुमारे नऊशे कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या महापालिकांमध्ये सनदी अधिकारी, तर अन्य महापालिकांमध्ये मुख्याधिकारी नियुक्त करण्याबाबत कायदेशीर सुधारणा करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागाला दिले आहेत. यापूर्वी ड वर्ग महापालिकांवर बिगर सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती होत होती. मुख्यमंत्र्यांच्या या आदेशांमुळे शिंदे नाराज असल्याची माहिती मिळाली आहे. राज्यात ड वर्गाच्या एकोणीस महापालिका आहेत. मात्र, या आदेशांवर फडणवीसांनी स्पष्टीकरण दिले आहे. "महापालिकांमध्ये केवळ आयएएस राहतील असं ठरलेलं नाही. जिथे आयुक्तांच्या जागा आयएएस नोटिफाइड आहे, तिथे आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती न झाल्यास केंद्राकडून आयएएसच्या जागा कमी केल्या जातात," असे फडणवीसांनी म्हटले आहे. हे स्पष्टीकरण या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न मानला जात आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola