Chain Snatching | पत्ता विचारण्याच्या बहाण्यानं महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोथ चोरली
नाशिकच्या रामवाडी परिसरात पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्यांची सोन्याची पोत हिसकावल्याची घटना समोर आली आहे. एक अज्ञात व्यक्ती पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या घराच्या दरवाज्यात आला. त्याने महिलेचा पाठलाग करून तिच्या घरात प्रवेश केला आणि तिच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून घेतली. महिलेने प्रतिकार करण्याचा आणि चोरट्यांना पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला. तिने मदतीसाठी आरडाओरडही केली, परंतु वेळेत मदत पोहोचू शकली नाही. अखेर दोन्ही चोरटे घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.