Varkari On Sushma Andhare: सुषमा अंधारेची पक्षातून हकालपट्टी करा , वारकऱ्यांची उद्धव ठाकरेंकडे मागणी
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसुषमा अंधारेची पक्षातून हकालपट्टी करा , वारकऱ्यांची उद्धव ठाकरेंकडे मागणी. सुषमा अंधारे ज्या पक्षात राहतील त्या पक्षाला मतदान न करण्याची वारकऱ्यांनी घेतली गंगासागर येथे शपथ. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे या हिंदू धर्मियांच्या देव देवतांबद्दल बोलतानाचा व्हिडीओ समाज माध्यमात सर्वत्र व्हायरल होत असताना आता वारकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी पश्चिम बंगालच्या गंगा सागर येथील समुद्र किनारी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी सुषमा अंधारे येणाची त्वरित पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे व राज्यातील वारकऱ्यांना शपथ देऊन सुषमा अंधारे ज्या पक्षात जातील त्या पक्षाला मतदान न करण्याची शपथ दिली आहे व आगामी काळात राज्यातील वारकरी अशी शपथ घेतली अस आवाहन केलं आहे. त्यामुळे आगामी काळात सुषमा अंधारे व वारकरी संघटना यांच्यात नवीन संघर्ष बघायला मिळू शकतो.