Raigad : दुर्गराज रायगडला राष्ट्रपतींची भेट; 'भवानी तलवार' आणि 'शिवराई होन'ची प्रतिकृती भेट
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा केला. राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी राष्ट्रपती कोविंद यांचं रायगडावर स्वागत केलं. रायगडावर हेलिकॉप्टर उतरवण्यास शिवप्रेमींनी विरोध केल्यानं ते रायगडाच्या पायथ्याशी पाचाडमध्ये हेलिकॉप्टरमधून दाखल झाले. आणि त्यानंतर रोप वेने ते रायगडावर पोहोचले. तब्बल 35 वर्षांनी देशाचे राष्ट्रपती किल्ले रायगडावर आले आहेत. याआधी 1981 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी किल्ले रायगडावर आल्या होत्या. तेव्हा त्यांनी राज सदरेत मेघ डंबरी बांधण्याची सूचना केली होती. त्यानुसार मेघ डंबरी बांधून पूर्ण झाल्यानंतर 1985 साली तिचं लोकार्पण करण्यासाठी तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग रायगडावर आले होते. त्यानंतर आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद रायगडावर येत शिवरायांना अभिवादन केलं.