EXCLUSIVE :माझी नाराजी नाही पण, पंकजा मुंडे म्हणाल्या...;केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड माझावर

Continues below advertisement

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच झाला. या विस्तारात प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्यानं भाजप नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मुंडे यांना डावलून डॉ भागवत कराड यांना संधी दिली असल्याचं देखील बोललं जात आहे. काही मुंडे समर्थकांनी आपापल्या पदांचा राजीनामा देण्याचं पाऊल देखील उचललं आहे. अशात केंद्रीय राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी पंकजा मुंडे यांच्याशी भेट झाली असल्याचं सांगितलं आहे. पंकजा मुंडेंसोबत झालेल्या भेटीवर केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी एबीपी माझाशी एक्स्क्लुझिव्ह संवाद साधला.

ते म्हणाले की,  पंकजाताई दिल्लीत आल्यात हे समजल्यानंतर मी त्यांना फोन केला. भेटीत सविस्तर चर्चा झाली.  माझी नाराजी काही नाही पण ज्या तऱ्हेने झालं त्याबद्दल थोडं वेगळं वाटलं असं त्या म्हणाल्या, असं कराड म्हणाले.  मला जो फोन आला होता तो केंद्रीय कार्यालयातून आला होता. मी कोअर कमिटीला सुद्धा सांगितलं नव्हतं. माझ्या मताने तरी ताईंच्या मनात कसली नाराज नाही, असंही ते म्हणाले. .

भागवत कराड म्हणाले की, मी जेव्हा राजकारणात आलो तेव्हापासून मुंडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय.  पंकजाताई आणि आम्ही सगळे एका कुटुंबासारखे आहोत.  राजकारणाचं बाळकडू फक्त आणि फक्त गोपीनाथ मुंडे यांनी दिलं आहे.  राजकारणातल्या त्यांच्या प्रत्येक सुख दुःखात मी राहिलो आहे, असं ते म्हणाले. 

ते म्हणाले की, कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो मीसुद्धा मुंडे साहेबांचा कार्यकर्ता आहे. पंकजाताई आमच्या नेत्या आहेत. मी केवळ प्रतीकात्मक आहे. मंत्रिपद मुंडे साहेबांच्या कार्यकर्त्याला दिले आहे हे लक्षात घ्यावे. दुसरं कुठलं पाऊल पंकजाताई बिलकुल उचलणार नाहीत, असं ते म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram