Paper Leak : पेपरफुटी प्रकरणातील खळबळजनक ऑडिओ क्लिप 'माझा'च्या हाती, पेपरफुटीचा पर्दाफाश
Continues below advertisement
राज्यातील शासकीय सेवेतील भरती परीक्षेतील खळबळजनक ऑडिओ क्लिप माझाच्या हाती लागली आहे ज्यात राज्यातील टीईटी, आरोग्य, म्हाडाच्या भरती प्रकरणात कशाप्रकारे पेपर फोडला आणि ही पेपर फोडणारी टोळी राज्यभर पसरल्याचं या ऑडिओ क्लिपमधून समोर येतं आहे. एमपीएससी समन्वय समितीच्या सदस्यानं अशाच एका एजंटबरोबर संभाषण केलं, आणि या एजंटनं राज्यभर सुरु असलेला हा गैरव्यवहार, घोटाळा उघडकीस आणलाय... तर पेपरफुटी प्रकरणात 14 टोळ्या कार्यरत होत्या. राज्यात 50 हून अधिक एजंट्सकडून हे पेपर फोडण्याचं काम केलं जायचं... आणि परभणी,पुणे, औरंगाबाद, बुलढाणा, परळीत या टोळ्या सर्वाधिकरित्या सक्रीय होत्या... असा देखील उल्लेख या ऑडिओ क्लिपमध्ये आहे.
Continues below advertisement