ABP News

उपोषण स्थगित केल्याचा विश्वासार्हतेवर परिणाम झाल्यास काही फरक पडत नाही : अण्णा हजारे

Continues below advertisement

राळेगण सिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उद्यापासून होऊ घातलेल्या आपल्या उपोषणाला स्थगिती दिली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या शिष्टाईला यश आलं आहे. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा 50 टक्के जास्त हमीभाव द्यावा तसेच स्वामीनाथन आयोगाला स्वायत्तता द्यावी अशी मागणी अण्णांनी केली होती. मात्र अण्णांची मागणी मान्य न झाल्याने अण्णांनी आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला होता. गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून अण्णांची मनधरणी करण्यात येत होती. फडणवीस यांनी याआधी देखील अण्णांची भेट घेतली होती. आज केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांच्यासह पुन्हा अण्णांची भेट घेतली आणि अण्णांची मनधरणी केली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram