EVM Expert Exclusive : ईव्हिएमचा संशयकल्लोळ; तज्ज्ञांचा शेरा काय ?

Continues below advertisement

EVM Expert Exclusive :  ईव्हिएमचा संशयकल्लोळ; तज्ज्ञांचा शेरा काय ? 

हेही वाचा  :

महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील 24 ते 48 तास अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. कारण, महाराष्ट्रात सरकार स्थापनेची कसरत आता दिल्लीत सुरू झाली आहे. गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबत अनेक घडामोडी सुरू आहेत. अशातच राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री नेत्यांच्या आणि आपल्या पक्षांच्या आमदारांच्या भेटी नाकारत आहेत, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) दिल्लीत पोहोचले आहेत. मुंबईत शपथविधीची जय्यत तयारी सुरू असताना अजित पवार (Ajit Pawar) दिल्लीत का गेले याबाबतची चर्चा आहे, मात्र, अजित पवारांची दिल्ली वारी कशासाठी याची माहिती एबीपी माझाच्या हाती आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवारांनी (Ajit Pawar) स्ट्राइक रेटच्या आधारे मंत्रीपद वाढवून हवी असल्याच्या मागणीसाठी भाजप श्रेष्ठींना भेटण्यासाठी दिल्ली वारी केल्याचं समजतंय.

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या दिल्ली वारीचं कारण एबीपी माझाच्या हाती आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मिळालेल्या स्ट्राइक रेटच्या आधारे मंत्रीपद वाढवून हवी आहेत. जेवढी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तेवढीच राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षाला मंत्रिपद मिळावीत अशी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पक्षाची भूमिका आहे. दिल्लीतील भाजप श्रेष्ठींना भेटून मंत्रीपद वाढवण्याच्या संदर्भात राष्ट्रवादीचे नेते चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. अजित पवार सध्या दिल्लीत आहेत. मात्र, अद्याप अमित शाह यांच्या भेटीसाठी अजित पवार (Ajit Pawar) वेटिंगवर आहेत. मंत्रीपदाच्या वाटपात एखादी जागा कमी आली तरी चालेल. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बरोबरीने जागा मिळायला हव्यात अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram