Maharashtra Exams: आरोग्य भरतीसह सैन्य भरती आणि पोलिस भरतीचे पेपर फोडल्याचे पुरावे समोर
बातमी पेपरफुटीचं रॅकेट चालवणाऱ्या टोळीची. या घोटाळ्याचा पर्दाफाश करणारी महत्त्वाची ऑडिओ क्लिप एबीपी माझाच्या हाती लागलीय.......
देशभरात होणाऱ्या वेगवेगळ्या नोकरभरतीचे पेपर फोडून लाखो रुपयांना विक्री करणारी टोळी कार्यरत असल्याचं धक्कादायक वास्तव या ऑ़डिओ क्लिपमधून समोर आलंय. याच टोळीनं ३१ ऑक्टोबरला झालेल्या आरोग्य विभागाच्या परीक्षेचा पेपर फोडल्याचे पुरावे एबीपी माझाच्या हाती लागलेत. धक्कादायक बाब म्हणजे रायगड जिल्ह्यात पोलीस भरतीचा पेपरही याच टोळीनं फोडला होता आणि देशभरात रद्द करण्यात आलेल्या सैन्य भरती परीक्षेचा पेपरही याच टोळीनं फोडल्याचं समोर आलंय. लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेला ही माहिती मिळाली आहे. आर्मी इंटलिजन्सनं अटक केलेल्या लष्करातील हवालदार अनिल चव्हाणके याच्या ऑडिओ क्लिपमधून घोटाळ्याचा पर्दाफाश झालाय. एकीकडे पोलीस याबाबत घोटाळा नसल्याचा दावा करत असताना समोर आलेल्या माहितीमुळे पोलीस नेमकं काय दडवण्याचा प्रयत्न करतायत असा सवाल उपस्थित होतोय.