Jyoti Deore : जळगावात बदली झाल्यानंतरही तहसीलदार ज्योती देवरे यांच्या अडचणीत वाढ ABP Majha
Continues below advertisement
पारनेर तालुक्याचे तहसीलदार ज्योती देवरे यांची अखेर बदली करण्यात आलीये. ज्योती देवरे यांची जळगाव येथे तहसीलदार पदावर बदली करण्यात आलीये. तहसीलदार ज्योती देवरे यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्येचा इशारा देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल केली होती. या ऑडिओ क्लिपमुळे संपूर्ण जिल्हा ढवळून निघाला होेता. या क्लिप मध्ये महिला अधिकारी म्हणून काम करताना नोकरीत होणारा त्रास, तसेच वरिष्ठांचे दुर्लक्ष या बाबत सविस्तर कथन केले होते. इतकेच नाही तर लोकप्रतिनिधी कडून होणारा त्रास देखील त्यांनी सांगितला होता. क्लिपनंतर ज्योती देवरे यांच्या विरोधातही तक्रारी करण्यात आल्या तर देवरे यांनी देखील तक्रारी केल्या. या सर्वांची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली. यामध्ये ज्योती देवरे यांनी केलेल्या आरोपात कुठलेही तथ्य नसल्याचे चौकशीत समोर आले. त्यानंतर ज्योती देवरे यांच्या बदलीचा आदेश जारी करण्यात आलाय. या आदेशामध्ये ज्योती देवरे यांनी समाजमाध्यमे, वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातून भाष्य केल्याने शासनाची प्रतिमा मलिन झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. इतकेच नाही तर ज्योती देवरे यांनी तहसीलदार पदावर कार्यरत असताना शासकीय कामकाजात पारायणता ठेवली नसून कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पार पडलेल्या नाहीत असेही आदेशात नमूद करण्यात आले. या कारणास्तव ज्योती देवरे यांची अखेर जळगाव येथे बदली करण्यात आलीये.
Continues below advertisement