Rajan Vichare : सफाई कामगारांना समान काम ,समान वेतन द्या, राजन विचारेंची आयुक्तांकडे मागणी
नवी मुंबई मनपातील कामगारांना समान काम समान वेतन लागू करावे आणि कोविड भत्ता तात्काळ देण्यात यावा या मागणी करता खासदार राजन विचारे व खासदार श्रीकांत शिंदे यांनी मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेतलीय. सर्व चतुर्थ श्रेणीतील कामगारांनी कोविड काळात आपल्या जीवाची बाजी लावत काम केलंय आणि यामुळेच महानगरपालिकेला स्वच्छतेत नामांकन मिळालेत. या कामगारांचा प्रामुख्याने विचार करावा अशी आग्रही मागणी यावेळी खासदारांनी आयुक्तांकडे केलीय. यावेळी आयुक्तांनी कामगारांच्या प्रश्नांसंबंधी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे शिवसेनेने सांगितले.