EPF One Lac : ईपीएफमधून काढता येणार 1 लाख रुपये, मर्यादा वाढवली
EPF One Lac : ईपीएफमधून काढता येणार 1 लाख रुपये, मर्यादा वाढवली
कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (ईपीएफओ) सदस्यांना कर्मचारी भविष्य निधीतून (ईपीएफ) मधून वैयक्तिक आर्थिक गरज भागविण्यासाठी एकावेळी पैसे काढण्याची मर्यादा ५० हजार रुपयांवरून १ लाख करण्याचा निर्णय केंद्रीय श्रम मंत्रालयाने घेतला आहे. केंद्रीय श्रममंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की, ईपीएफओच्या परिचालनासाठी अनेक नियमांत बदल करण्यात आले आहेत. ईपीएफओचे डिजिटल आर्किटेक्चर नूतनीकृत करण्यात आले आहे. सदस्यांना गैरसोय सोसावी लागू नये, यासाठी नियम अधिक लवचिक व प्रतिसादक्षम करण्यात आले आहे. विद्यमान नोकरीत ६ महिने पूर्ण न करणाऱ्या नवीन सदस्यांनाही आता ईपीएफमधून पैसे काढता येतील. आधी त्यांना ही परवानगी नव्हती.