MPSC | महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली, MPSC आयोगाचे परिपत्रक
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 1 आणि 22 नोव्हेंबरला होणाऱ्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020 व महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब परीक्षा संयुक्त परीक्षा 2020 पुढे ढकलली आहे. याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्रसिध्दीपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षा कधी होणार त्याच्या तारखा यशावकाश जाहीर करण्यात येतील असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हटलं आहे.