Juhu Fishermen | जुहू मोरागावच्या जमिनीवर भूमाफियांचा डोळा, स्थानिक कोळीबांधवांचा आरोप, पोलिसात तक्रार

Continues below advertisement

मुंबईतल्या प्रसिद्ध जुहू बीचवर मच्छिमारांना मासेविक्रीची परवानगी मिळालीय. मात्र, जुहू मोरागाव इथल्या जमिनीवर भूमाफियांचा डोळा असल्याचा आरोप कोळीबांधवांनी केलाय..हे भूमाफियांकडून सतत त्रास देतात अशी तक्रारही कोळीबांधवांनी केली आहे.जुहू मोरागावची संपूर्ण जागा बंदर आणि कोळीवाडा म्हणून घोषित करण्यात आलीय.तरीदेखील आमची जागा बळकावण्यासाठी बिल्डर त्रास देतात असा आरोप कोळीबांधवांनी केलाय.मराठी बांधवांवर सातत्याने दबाव आणण्याचा प्रयत्न होतोय. त्यामुळे याबाबत कारवाई करुन आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी कोळीबांधवांनी केलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram