Employee Strike : वीज वितरणचे कामगार संपावर ठाम, राज्यात वीज तुटवड्याची भीती
एकीकडे एसटीच्या संपामुळे राज्यातल्या ग्रामीण भागांना फटका पडत असताना.. आता आणखी एका संपाचं संकट राज्यावर उभं ठाकलंय मात्र यावेळी हे संकट शहरी भागही कवेत घेण्याची शक्यता आहे.. कारण वीज वितरण कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पुढच्या 2 ते 3 दिवसात महाराष्ट्र अंधारात जाण्याची भीती निर्माण झालेय....कारण काल सुरू झालेला वीज कर्मचाऱ्यांचा संप आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झालीय... कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी ऊर्जामंत्र्यांसोबत मुंबईत काल बैठक झाली..पण ती बैठक निष्फळ ठरलीय...शिवाय आज ऊर्जामंत्र्यांसोबत होणारी बैठकही रद्द करण्यात आलीय.. वीज निर्मिती आणि कोळसा पुरवठा करणाऱ्या अनेक केंद्रावरच्या संघटनांनी संप पुकारल्यानं विजेचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कोयना धरणाचं पायथा विद्युतगृह बंद पडलं आहे. त्यामुळं संपावर तोडगा न निघाल्यास वीजटंचाई निर्माण होण्याची दाट चिन्हं आहेत. तिकडे बदलापुरात अनेक भागांमधला वीजपुरवठा तब्बल साडेपाच तास गायब होता.संप सुरु असल्यानं महावितरणला फोन केल्यानंतरही कुठलाही प्रतिसाद मिळत नव्हता..तब्बल साडेपाच तासांनंतर वीजपुरवठा सुरळीत झाला.