Emergency Era | जेलमध्ये आदर्श निवडणूक - लोकशाहीचे संवर्धन करण्याचा अनोखा प्रयोग
आणीबाणीच्या काळात नागपूर सेंट्रल जेलमध्ये पाचशे मिसा कैद्यांनी मतदान केले होते. लोकतंत्र सेनानी संघाचे उपाध्यक्ष रवी कासखेडकर यांनी या आदर्श निवडणुकीबद्दल माहिती दिली. जेष्ठ स्वयंसेवक आणि पत्रकार माधव वैद्य यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत दोन उमेदवार होते - एक भंडारा जिल्ह्यातील अशिक्षित आणि दुसरा नागपूरचा सुशिक्षित. निवडणुकीपूर्वी 'हाइड पार्क कॉर्नर'सारखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.