Mumbai Local Train Accident | प्रवाशाचा हात आणि बॅग लागून दुर्घटना घडल्याचा अंदाज, अहवालात महत्त्वाचा खुलासा
मुंब्रा लोकल अपघाताच्या प्राथमिक अहवालात दोन्ही लोकल घासल्या नसल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. प्रवाशाचा हात आणि बॅग इतर प्रवाशाला लागून दुर्घटना घडल्याचा अंदाज अहवालात व्यक्त केला आहे. महायुतीतील सात मंत्र्यांना अजूनही खासगी सचिव नाहीत, तर काही मंत्र्यांकडे परवानगीशिवाय खासगी सचिव आणि विशेष कार्यकारी अधिकारी आहेत. मशिदींवरील भोंग्यांबाबत मुस्लिम शिष्टमंडळाने अजित पवार यांची भेट घेतली. भारतासाठी आज ऐतिहासिक दिवस असून अंतराळवीर शुभांशू शुक्ला एक्सीयम4 मोहिमेद्वारे अंतराळात झेपावणार आहेत.