Elvish Yadav : एल्विशची आरती राजकीय कवित्व; राऊत फडणवीस आमनेसामने
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppElvish Yadav : एल्विशची आरती राजकीय कवित्व; राऊत फडणवीस आमनेसामने
नोएडातील एका पार्टीत अंमली पदार्थ आणि सापाचे विष पुरवल्याप्रकरणी आरोप असलेला 'बिग बॉस'चा विजेता एल्विश यादवविरोधात गुन्हा दाखल झालाय... याच एल्विशच्या हस्ते वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गणपतीची आरती करण्यात आली होती.
याप्रकरणावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत... एल्विश यादवला वर्षावर घेऊन येणार खासदार ड्रग्ज सेवन करतो, तर ड्रग्ज प्रकरणाची सूत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यात आहे का? असा सवालही संजय राऊतांनी केलाय. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राऊतांना उत्तर दिलंय... ठाकरे गटाचे वैफल्यग्रस्त नेते एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करताय. असं फडणवीस म्हणालेत... दरम्यान विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय..