Kokan Elephant : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली गावात हत्तीचा धुडगूस, भात आणि नाचणीच्या शेतीचं नुकसान
Continues below advertisement
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली गावात टस्कर हत्तीनं भात आणि नाचणी शेतीचं नुकसान केलं आहे. मागील काही दिवस अज्ञातवासात असलेला हत्ती पुन्हा आंबोली-फणसवाडी परिसरात रात्री परतला. काल रात्री टस्कर हत्तीनं फणसवाडी परिसरातील नाचणी आणि भातशेतीच्या शेतात धुडगूस घातला. शेतातील साहित्याची नासधूस केली. पाण्याची टाकी, पाईपलाईनचा चेंदामेंदा केला. हत्ती पुन्हा आंबोली परिसरात दाखल झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वन विभागाने हत्तीचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
Continues below advertisement
Tags :
Konkan Kokan Sindhudurg Elephant Attack Tusker Elephant Elephant Destoryes Farm Amboli Elephant Sindhudurg Elephant