Election : शिवसेनेचे आमदार पवईच्या वेस्टिन हॉटेलमध्ये, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसची धावपळ

Election : विधान परिषदेच्या आखाड्यात... इथे आमदार होऊनच येता येतं... आणि यासाठी सध्या ११ जण इच्छुक आहेत... पण जागा मात्र १० आहेत... त्यामुळे साहजिकच कुणाला एकाला घरी बसावं लागणार... कोण घरी बसणार ते २० जूनलाच समजणार... पण या दहा जणांसाठी गेल्या दहा दिवसांपासून भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसची धावपळ सुरु आहे... याचदृष्टीनं आता सगळ्या पक्ष आपआपल्या आमदारांना मुंबईत बोलावणारेय... शिवसेनेकडून आपल्या आमदारांना पवईच्या वेस्टिन हॉटेलमध्ये ठेवलंय... तर राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या सकाळी ११ पर्यंत मुंबईत येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत... तर भाजपच्या आमदारांना निवडणुकीच्या दोन दिवस आधीच ताज हॉटेलमध्ये हलविण्यात येणार असून एकही मत फुटणार नाही याची काळजी घेतली जात आहे.... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola