Bhagat Singh Koshyari : मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरेंनी राज्यपालांची भेट घेत दिल्या शुभेच्छा

Continues below advertisement

Bhagat Singh Koshyari : राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  यांच्यातील विळा-भोपळ्याचं नातं संपूर्ण राज्याला माहित आहे. अनेक विषयांवरुन ठाकरे सरकार आणि राज्यपाल यांच्यात वाद झाले आहेत. विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्ती असो आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा वाढदिवस आहे. अनेक नेत्यांनी राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही आज राजभवनावर जात राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. राजभवन इथं मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ आणि शाल देऊन शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपस्थित पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनीही राज्यपाल कोश्यारी यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर हात ठेवत आशिर्वादही दिले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram