Elections Commission PC on Lok Sabha : निवडणूक आयोग उद्या मोठी घोषणा करणार?

Continues below advertisement

नवी दिल्ली: इलेक्टोरल बाँड्स (Electoral Bonds) म्हणजे निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून कोणत्या पक्षाला किती निधी मिळाला ते सोमवारपर्यंत जाहीर करा असं सांगत सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँकेला झापताच (Supreme Court On Electoral Bonds), काहीच वेळात निवडणूक आयोगाने शनिवारी पत्रकार परिषद घेण्याचं जाहीर केलं. निवडणूक आयोगाच्या या पत्रकार परिषदेमुळे शनिवार, 16 मार्च रोजी देशभरात आचारसंहिता (Model Code Of Conduct) लागू होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून (Electoral Bonds) कोणत्या पक्षाला किती निधी मिळाला ही माहिती जाहीर करण्याला आचारसंहितेची आडकाठी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी, 15 मार्च रोजी पत्रकार परिषद घेण्याचं जाहीर केलं. त्यावेळी लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर (Lok Sabha Election Schedule 2024) करण्यात येणार आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता ही 16 मार्चपासून लागू होणार हे स्पष्ट झालं आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram