Eknath Shinde Speech Samruddhi Highway :नागूपर ते मुंबई गेम चेंजर प्रकल्प पूर्ण, एकनाथ शिंदेंचं भाषण

Samruddhi Mahamarg : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गातील इगतपुरी-आमणे (Igatpuri to Amane) या 76 किमी लांबीच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण गुरुवारी (5 जून) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह महायुतीतील अनेक मंत्री उपस्थित होते. या मार्गामुळे इगतपुरी ते कसाराचे अंतर अवघ्या 8 मिनिटात गाठता येणार आहे. 76 किलोमीटरच्या या टप्प्यात एकूण 5 बोगदे आहेत.मात्र सर्वाधिक लांबीचा 8 किलोमीटरचा बोगदा नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीपासून सुरू होतो. राज्यातील सर्वाधिक लांबीचा हा बोगदा आहे. काय आहेत या बोगद्याची वैशिष्ट्ये जाणून घेऊयात... 

बोगद्याची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे

- 17.5 मीटर रुंदी आणि 9 मीटर उंचीचा हा बोगदा असून याला एकूण तीन लेन आहेत. ताशी 100 किलोमीटरच्या वेगाने येथून प्रवास करता येणार आहे. 

- बोगद्यातील भिंतींना पॅसिव्ह फायर प्रोटेक्शन देतानाच भिंतींना लाईट रिफ्लेकटींग लावण्यात आले आहे, ज्यामुळे रस्त्यावर दिव्यांचा लखलखाट दिसतो. 

- प्रत्येक 300 मीटर अंतरावर एक असे एकूण 26 क्रॉस पॅसेज देण्यात आले आहे. एखादा अपघात घडला तर जवळच्या क्रॉस पॅसेजमधून बाहेर पडता येईल. 

- प्रत्येक 90 मीटरच्या अंतरावर अग्निरोधक यंत्रणा बसविण्यात आली आहे,  एखाद्या वाहनाला आग लागली आणि बोगद्यातील तापमान 60 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाली तर अटोमॅटिक स्प्रिंकल सुरू होतात, देशात पहिल्यांदाच या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय. डेन्मार्कहून हे तंत्रज्ञान मागविण्यात आले आहे.24 मीटरचा एक झोन आहे, असे एका टनेलमध्ये 286 आणि दोन्ही बोगदे मिळून 572 झोन तयार करण्यात आले आहे. 

- 100 डबल एक्सल रिव्हसेबल व्हेंटिलेशन फॅन बसविण्यात आले आहेत. यामुळे हवा खेळती राहण्यास आणि गाड्यांचा धूर बाहेर निघण्यास मदत होणार आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola