Pune By-Elections :पुण्यातील पोटनिवडणुकीत उमेदवार आणि दिग्गज नेत्यांकडून धुरळा,आज कोणकोण घेणार सभा?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यातल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय... उद्या संध्याकाळी पाच वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत... त्यामुळे आजची संध्याकाळी ही नेत्यांच्या सभांची, रोडशो आणि रॅलीची अखेरची संध्याकाळ आहे... त्यामुळे आज प्रचारासाठी दोन्ही बाजूचे नेते प्रचारासाठी तकद पणाला लावणार आहेत... भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भिडे पुलापासुन पदयात्रा काढणार आहेत. त्यानंतर डेक्कनच्या नदीपात्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे. कॉंग्रेसचे कसब्याचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्यासाठी आदित्य ठाकरे हे रोड शो करणार आहेत. त्यानंतर आदित्य ठाकरे आणि नाना पटोले यांची चिंचेची तालीम इथे एकत्रित सभा होणार आहे. चिंचवडमध्येही... अजित पवार, नाना पटोले, छगन भुजबळ , एकनाथ खडसे, जयंत पाटील मविआसाठी.. तर बावनकुळे फडणवीस हे भाजपसाठी प्रचाराचा धुरळा उधळणार आहेतत