Eknath Shinde On Worli Hit And Run : कुणालाही पाठिशी घालणार नाही, 'हिट ॲण्ड रन'बाबत शिंदेंची ग्वाही

Continues below advertisement

Eknath Shinde On Worli Hit And Run : कुणालाही पाठिशी घालणार नाही, 'हिट ॲण्ड रन'बाबत शिंदेंची ग्वाही  वरळीतील हिट अँड रन प्रकरणात कुणालाही अभय दिले जाणार नाही. कायद्यासमोर सर्वांना समान वागणूक दिला जाईल. मग तो कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी व कार्यकर्ता असो. सरकार आणि कायद्यापुढे सर्व समान असल्याची आमची भूमिका आहे. त्यामुळे वरळीत घडलेल्या घटनेला आम्ही काही वेगळा न्याय देणार नसून जे होईल ते कायद्यानुसारच होईल. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. अशा घटना वारंवार होऊ नये यासाठी सरकार आणि गृह विभाग नक्कीच योग्य त्या उपाययोजना करतील, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. सध्या घडीला विरोधी पक्षाकडे कुठलेही काम राहिले नाही. त्यामुळे या घटनेमध्ये असे समजण्याचे कुठलेही कारण नाही की, कोण कोणाला पाठीशी घालत आहे. तो कार्यकर्ता शिवसेना पक्षाचा असला तरी सर्वांना समान न्याय देण्याची आमची मनीषा आहे. राज्यातलं सरकार हे सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे. कोणी कितीही आरोप केले तरी त्यात फार अर्थ नाही. असेही मुख्यमंत्री म्हणाले.  राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने  नुकतीच महायुतीची बैठक पार पडली यामध्ये विधानसभा निवडणुकीत जागावाटपसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे. यावेळी ते म्हणाले की,आगामी विधान परिषदेसाठी आमच्या असून  या सर्व जागा आम्ही मोठा मताधिक्याने जिंकू असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी बोलताना व्यक्त केला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram