Eknath Shinde On Uddhav Thackeray : ठाकरेंच्या डोक्यात लिंबू-मिरची म्हणून..शिंदेंचा ठाकरेंना टोला
Eknath Shinde On Uddhav Thackeray : ठाकरेंच्या डोक्यात लिंबू-मिरची म्हणून..शिंदेंचा ठाकरेंना टोला
पावसाळी अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस प्रचंड गाजतोय. याचं कारण ठरतेय दोन बड्या नेत्यांची भेट. हे दोन नेते आहेत उपमुख्यमंत्री आणि विधानभवनाच्या लिफ्टमध्ये हे दोन नेते योगायोगानं एकत्र आले. परिस्थिती ओळखून दोघंही एकमेकांशी सौहार्दानं बोलले. मात्र राजकीय वर्तुळात आणि तज्ज्ञांमध्ये लगेचच चर्चांना उधाण आले आहे. आता या भेटनंतर उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. त्यांची लिफ्ट सहाव्या मजल्यापर्यंत (मंत्रालयाचा सहावा मजल्यावर मुख्यमंत्र्यांचे दालन आहे) पोहचू शकत नाही, असा टोला लगावला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
विधानसभा निवडणुका तीन महिन्यांवर आल्या आहेत, महायुती आणि मविआतलं जागावाटप अजून व्हायचं आहे. लोकसभेत भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर योयायोगानं झालेल्या या भेटीला प्रचंड महत्त्व आलं आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, लिफ्ट मागितली तरी ती लिफ्ट सहाव्या मजल्यापर्यंत पोहचू शकत नाही. दोन वर्षापूर्वी ते काँग्रेसच्या लिफ्टमध्ये शिफ्ट झाल्याने आम्ही जनतेच्या लिफ्टमध्ये आलो. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील सरकार आम्ही स्थापन केले. लिफ्टमध्ये गेल्याने ते युतीत येणार आहे असे होत नाही.