Pankaja Munde यांना धोका दिला? शिंदेंच्या जिल्हाप्रमुखाची क्लिप खरी? Kundlik Khande Audio Clip

Pankaja Munde यांना धोका दिला? शिंदेंच्या जिल्हाप्रमुखाची क्लिप खरी? Kundlik Khande Audio Clip

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना निवडणुकीत मतांसह पैश्याची मदत केल्याची दिली कबुली, ऑडिओ क्लिप व्हायरल    राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शिवराज बांगर यांच्याशी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची  संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल   मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला करण्याची देखील खांडेची भाषा  बीड लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी बजरंग सोनवणे यांचे काम केले असल्याची कबुली एका कथित  ऑडिओ क्लिप मध्ये ते स्वतः देताना दिसत आहेत. यामध्ये त्यांनी कशा पद्धतीने मदत केली पंकजा मुंडे यांना पहिल्यांदाच असा धोका दिला हे देखील सांगत असून आता बीड लोकसभा निवडणुकीत कशा पद्धतीने कोण कोणाचे काम करत होते हेच या निमित्ताने समोर आले आहे. याबरोबरच धनंजय मुंडे हे बीडमध्ये येताच त्यांच्या गाडीवर मी हल्ला करतो असे देखील त्यांनी या कथीत ऑडिओ क्लिप मध्ये म्हटल्याचे दिसते. निवडणूक निकालापूर्वी झालेल्या या कथित संभाषणाची या ऑडिओ क्लिप आता वायरल झाली असून याची जोरदार चर्चा आता बीड लोकसभा मतदारसंघात होताना दिसत आहे  यावर कुंडलिक खाडे यांनी फोन वर हा माझा आवाज नाही म्हटलं आहे मात्र पण आता त्यांचा मोबाईल बंद आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola