Eknath Shinde on Threat Letter : धमक्यांना घाबरत नाही, नक्षलवाद संपवायला विकास करत राहणार!
राज्याच्या नगर विकास मंत्र्यांना नक्षलवाद्यांकडून धमकीचे पत्र आल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदे हे ठाणे प्रमाणेच गडचिरोलीचे देखील पालकमंत्री आहेत. गेल्या काही महिन्यात त्यांनी गडचिरोली येथे विकास कामांचा धडाका लावला, त्याचप्रमाणे अनेक नक्षलवाद्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणले, त्यामुळे गडचिरोली आणि आसपासच्या जिल्ह्यातील नक्षलवादी नाराज असल्याचे सूत्रांनी सांगितले. याच नाराजीतून त्यांना एक पत्र देण्यात मिळाले आहे. या पत्रामध्ये, विकास कामे करू नका, अशी धमकी त्यांना देण्यात आली आहे. त्या संदर्भात मुंबईतील पोलिस तपास करत असून ठाण्यात देखील हे पत्र कोणी पाठवले या संदर्भात तपास सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. 'गडचिरोलीचे पालकमंत्री झाल्यापासून अशा अनेक धमक्या आल्या आहेत. पण या धमक्यांना मी कधी घाबरत नाही. उद्या मी स्वतः गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्याला मुख्य प्रवाहात आणण्याचा माझा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.'