Eknath Shinde Oath Ceremony Update : एकनाथ शिंदे थोड्याच वेळात पत्र देण्यासाठी राजभवनवर जाणार

Continues below advertisement

Eknath Shinde Oath Ceremony Update : एकनाथ शिंदे थोड्याच वेळात पत्र देण्यासाठी राजभवनवर जाणार
मुंबई: महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला अवघे तीन तास शिल्लक असताना एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार की नाही, यावरुन प्रचंड संभ्रमाचे वातावरण होते. गुरुवारी सकाळपासून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आझाद मैदानावरील सोहळ्यात (Mahayuti Govenment oath Ceremony) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील की नाही, याबाबत उलटसुलट चर्चा सुरु होत्या. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर शिवसेनेचे सर्व आमदार ठाण मांडून बसले होते. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपद न स्वीकारता सरकारबाहेर राहून काम करण्याच्या मताचे होते. मात्र, तुम्ही कोणत्याही परिस्थितीत उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलेच पाहिजे. ते शिवसेना आमदारांसाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुम्ही सरकारमध्ये सामील झाले पाहिजे, असा धोशा शिवसेनेच्या सर्व आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे लावला होता. तसेच एकनाथ शिंदे सरकारमध्ये सामील झाले नाही तर आम्हीदेखील मंत्रीपदं स्वीकारणार नाही, अशा पवित्र्यात शिवसेना आमदार होते. अखेर या हट्टापुढे एकनाथ शिंदे यांना नमते घ्यावे लागले असून त्यांनी आजच उपमुख्यमंत्रिपदाची शपध घेण्यास होकार दर्शविला आहे. थोड्याचवेळात एकनाथ शिंदे यांच्या नावाने राजभवनावर पक्ष पाठवले जाईल. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा आजचा उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी निश्चित मानला जात आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram