Eknath Shinde MLA fight : दादा भुसे-महेंद्र थोरवेंची धक्काबुक्की, नेमकं काय घडलं ? ABP Majha

Eknath Shinde MLA fight : दादा भुसे-महेंद्र थोरवेंची धक्काबुक्की, नेमकं काय घडलं ? ABP Majha
ऐन निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमधील नेत्यांमधील धुसफूस समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय दादा भुसे आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यामध्ये बाचाबाची झाली. विधिमंडळाच्या लॉबीमध्येच सत्ताधारी आमदार भिडले आहेत.  भरत गोगावले आणि शंभुराज देसाई यांच्या मध्यस्थीनंतर हा वाद मिटल्याचं बोलले जातेय. दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांच्यातील वाद कोणत्या कारणामुळे झाला हे समजलं नाही. पण मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्र थोरवे यांनी मतदारसंघातील कामासंदर्भात दादा भुसे यांच्याकडे विचारणा केली. त्यावरुन दादा भुसे यांना ही गोष्ट खटकली. त्यावरुन दोघांमध्ये बाचाबाची आणि धक्काबुक्की झाली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola