Sant Namdev Maharaj Award | Eknath Shinde यांना पंढरपूरमध्ये पुरस्कार प्रदान
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पंढरपूरमध्ये भक्त शिरोमणी संत नामदेव महाराज पुरस्कार प्रदान करण्यात आला. संत नामदेव महाराज यांचे वंशज असलेल्या नामदास परिवार, प्रसाद महाराज अमळनेरकर, चैतन्य महाराज देगलूरकर, राणा महाराज लास्कर यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. पगडी, सन्मानपत्र, वीणा सन्मानचिन्ह आणि तुळशीहार देऊन शिंदेंचा सत्कार करण्यात आला. पुरस्कार प्रदान करतेवेळी एकनाथ शिंदे यांच्यावर वारकऱ्यांकडून पुष्पवृष्टी करण्यात आली. "मनापासून मनोभावे त्यांची सेवा करण्याची संधी किंबहुना प्रेरणा उर्जा मला या पुरस्कारामुळे प्राप्त झालेली आहे," असे त्यांनी सांगितले. यापूर्वी त्यांना संत तुकाराम महाराज पुरस्कार मिळाला होता. संत नामदेव महाराज संस्थांनी आणि त्यांच्या वंशजांनी हा पुरस्कार देऊन औदार्य दाखवले, असेही त्यांनी नमूद केले.