ABP News

Eknath Shinde Full Speech Dharmaveer 2 : धर्मवीर 2 चा ट्रेलर लाँच, एकनाथ शिंदेंचं तुफानी भाषण

Continues below advertisement

Eknath Shinde Full Speech Dharmaveer 2 : धर्मवीर 2 चा ट्रेलर लाँच, एकनाथ शिंदेंचं तुफानी भाषण 'धर्मवीर -2' (Dharmaveer 2) या सिनेमाचा नुकताच हिंदी आणि मराठी ट्रेलरही रिलीज करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हिंदी ट्रेलर लॉन्च करण्यासाठी बॉलीवूडचा भाईजान सलमान खानने (Salman Khan) विशेष उपस्थिती लावली. सलमानच्या उपस्थितीत या सिनेमाचा हिंदी ट्रेलर लॉन्च करण्यात आला. येत्या 9 ऑगस्ट रोजी हा सिनेमाचा संपूर्ण देशभरात रिलीज केला जाणार आहे.   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अशोक सराफ, सलमान खान ही मंडळी व्यासपीठावर उपस्थिती होती. दरम्यान पहिल्या सिनेमाच्या उदंड प्रतिसादानंतर हा सिनेमा हिंदीतही प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. त्यामुळे धर्मवीर-2 सिनेमा हा महाराष्ट्रासह संपूर्ण देशात हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे.   ट्रेलरमध्ये काय? दरम्यान या ट्रेलरमध्ये काही संवादांनी विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाचं कारण, आनंद दिघे यांचा मृत्यू कसा झाला असे अनेक प्रश्न उपस्थित करणारे संवाद यामध्ये आहेत. आनंद दिघे हे म्हणतात की,कुणाशीतरी आघाडी करुन तुम्ही विकलात तो भगवा रंग. हा संवाद सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेत आहे. तसेच एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारणाऱ्या क्षितिज दातेच्याही एका संवादाने लक्ष वेधून घेतलं आहे, 20 वर्षांपूर्वी याच ठाण्यात एक दाढीवाला बेसावध होता, पण जाताना दुसऱ्या दाढीवाल्याला सावध करुन गेला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram