Eknath Shinde Full PC : सर्वसामान्यांना परवडणारी घरं देणार, एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

Continues below advertisement

आज 6 हजार 442 घर लोकांना मिळणार त्यापैकी 2 हजार 700 घर  या योजनेमध्ये देण्यात आली 

3 हजार 662 घरांची आज सोडत काढली, 3 हजार 662 घरांसाठी एकूण 90 हजार अर्ज आले होते, 71 हजार ग्राहकांनी एमडी भरलं होत यावरून मागणी किती पटीने जास्त आहे हे आपण पाहतोय 

गेल्या दीड वर्षात जवळपास 30 हजार घर म्हाडा ने दिली साडे पाच लाख लोकांची घरांची मागणी होती 

हक्काची घर, स्वप्नांच घर आणि सर्वसामान्यांना परवडणारी घर देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला 

आता पुन्हा 5 फेब्रुवारीला कोकण म्हाडाची लॉटरी आहे त्यामध्ये देखील घर मिळतील त्यामुळे आज ज्यांना घर मिळाली ते खुश झाले आणि ज्यांना मिळाली नाहीत त्यांना पुढे मिळतील, ही निरंतर प्रक्रिया सुरुच राहणार आहे 

म्हाडाच नवीन धोरण देखील आम्ही आणतोय त्या धोरणामध्ये परवडणारी घर, परवडणार भाड, हॉस्टेल घर, जेष्ठ नागरिकांना घर, विद्यार्थ्यांसाठी हाऊसिंग या धोरणात असेल 

समाजाच्या प्रत्येक घटकाचा विचार करुन आम्ही निर्णय घेतोय, यामध्ये गिरणी कामगारांना घर, पोलिसांना घर, गरीब डबेवाल्यांचा देखील विचार आम्ही करतोय 

 सर्वसामान्य माणसाला घर मिळालं पाहिजे ही भूमिका आमच्या सरकारची आहे त्याची खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे 

 आदरणीय प्रधानमंत्री यांचे देखील सर्वांसाठी घर हे धोरण जी काय योजना आहे त्याचा देखील फायदा राज्यात लोकांना होत आहे 

 पंतप्रधान आवास योजना यात केंद्र आणि राज्य सरकार मिळून योजना ही योजना आम्ही पुढे नेतोय 

शहरी आणि ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणावर लोकांना परवडणारी घर मिळाली पाहिजे ही भूमिका आहे, आणि राखडलेले प्रकल्प मग झोपडपट्टी, म्हाडा, धोकादायक इमारती ते देखील आम्ही मार्गी लावत आहोत 

 डेव्हलपर ने सोडून दिलेले प्रकल्प एसआरए, म्हाडा, सिडको, एमआयडीसी आणि बीएमसी त्याच्याबरोबर ज्या काही आमच्या एजन्सीज आहेत त्यांच्या माध्यमातून राखडलेले प्रकल्प आम्ही टप्प्याटप्प्याने मार्गी लावणार आहोत,खास करून मुंबईतले रखडलेले प्रकल्प 

 मुंबईतला जो माणूस बाहेर फेकला गेलेला आहे त्याला पुन्हा मुंबईत आणण्यासाठी मुंबईतले प्रकल्प देखील पुढे नेतोय, मुंबई,ठाणे,पुणे एवढच नाही तर संपूर्ण राज्यभरात ही पॉलिसी आम्ही राबवतोय

आशिया खंडातील सर्वात मोठा मंजूर केलेला क्लस्टर ठाण्यात मोठ्याप्रमाणात सुरु आहे 

आपल्यावर लोकांनी जो विश्वास लोकांनी दाखवलेला आहे तो कायम टिकवण्यासाठी आपल्याला घराच्या कॉलीटीकडे, घर देण्याच्या वेळेमध्ये त्याच्याबरोबर घर देण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्याच्या सूचना मी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत 

सिडको च्या बाबतीतल्या योजना, प्रकल्प मी तपासून घेईल, हक्काचं घर देतांना लोकांना परवडल पाहिजे याचा देखील विचार सरकारने केलेला आहे 

झोपडपट्टी मुक्त शहर झाली पाहिजेत यासाठीच सर्व एजन्सीजला आम्ही एकत्रित घेऊन टप्पाटप्याने काही प्रकल्प दिले तर लोकांची गैरसोय होणार नाही आणि त्यांना वेळेत घर मिळतील

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram