Eknath Shinde Nomination Form | जोरदार शक्तीप्रदर्शन करत मुख्यमंत्री शिंदे भरणार उमेदवारी अर्ज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज ठाण्यातील कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल दाखल करणार आहेत. त्यापूर्वी त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी त्यांच्या पत्नी सौ. लता शिंदे आणि सून सौ. वृषाली शिंदे यांनी त्यांना ओवाळून विजयासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि नातू रुद्रांश हेदेखील उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी संत एकनाथ महाराजांचे वंशज योगीराज महाराज गोसावी यांनी येऊन शुभआशीर्वाद दिले. आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजयी व्हावे यासाठी शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री शिंदे यांनी पंढरपूरच्या वारी निर्मळ वारी व्हावी यासाठी भगीरथ प्रयत्न केले. तसेच वारकरी दिड्यांना 20 हजारांचे अनुदान दिले.त्यामुळे आज नऊ संतांचे पूर्वज त्यांना आशीर्वाद देण्यासाठी ठाणे येथे येत आहेत. त्याची सुरुवात एकनाथ महाराजांचे वंशज योगीराज महाराज गोसावी यांच्यापासून झाली.