Maharashtra Wine Special Report : 'मद्य सरकार' म्हणणारे वाईनविक्रीला परवानगी देणार?
Maharashtra Wine Sale : मॉलमध्ये वाईन विक्रीचा निर्णय राज्याच्या आणि शेतकऱ्यांच्या फायद्याचा राहिल, त्यासाठी कृषीमंत्री म्हणून माझा या निर्णयाला पाठींबा आहे. जे निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत. त्याला माझा कायम पाठिंबा असेल, असं स्पष्ट मत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केलं आहे. वाईन विक्रीचे हे धोरण शेतकऱ्यांच्या कसे फायद्याचे आहे हे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई भाजपच्या नेत्यांना पटवून देण्यात यशस्वी ठरतील, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला. ते पुण्यात बोलत होते.